मोदी सरकारच्या एका निर्णयानं चीनची लागली वाट, धडाधड बंद होतायत कंपन्या!

नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयाने चीनला मोठा दणका बसला आहे.भारतात इअरबड्स, नेक बँड आणि स्मार्टवॉच यांसारख्या विअरेबल वस्तूंचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. भारतीय ब्रँड्सनी देशातील 75% विअरेबल मार्केटवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यामुळे चीनमधील कारखान्यांच्या ऑर्डरवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी देशात एकापाठोपाठ एक अनेक कारखाने बंद होत आहेत. भारतामध्ये गेल्या वर्षात जवळपास 8,000 कोटी रुपयांच्या विअरेबल वस्तूंची निर्मिती झाली. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा एक मोठा निर्णय. सरकारने पूर्णपणे तयार विअरेबल वस्तूंच्या इम्पोर्टवर 20 टक्के बेसिक कस्टम ड्यूटी लावली होती. यामुळे कंपन्यांनी प्रोडक्ट चीनमधून आयात करण्याऐवजी ते देशातच तयार करायला सुरुवात केली. आज भारत जगभरातील विअरेबल्स मार्केटचा सर्वात मोठा बाजार म्हणून समोर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, बोट (Boat) आणि गिझमोर (Gizmore) सारखे ब्रँड्स बहुतेक विअरेबल वस्तू देशातच तयार करत आहेत. या कंपन्यांनी ठोक्याने वस्तू तयार करणारी कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज (Dixon Technologies) आणि ऑप्टीमस इलेक्ट्रॉनिक्स (Optiemus ...